Advertisement

अन पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

प्रजापत्र | Sunday, 16/06/2024
बातमी शेअर करा

आष्टी-लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा अल्पमतानी झालेल्या पराभवामुळे त्यांच्या हितचिंतकांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना बीड जिल्ह्यात समोर आल्या होत्या.यातील आष्टी  तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट मधुकर वायभसे (वय ३८) याने गळफास घेऊन जीवन संपविले होते.आज (दि.१६) पंकजा मुंडे यांनी वायभसे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करताना त्यांनाही अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळले.यावेळी आ.सुरेश धस,माजी आमदार भीमराव धोंडे यांची उपस्थिती होती. 
                   आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभसे (वय-३८) याने मंगळवार दि.११ रोजी आपल्या फेसबुकवर 'आलविदा'ची पोस्ट करत रात्री चिंचेवाडी येथे झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले होते.पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याचे सांगत त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते.आज पंकजा मुंडे यांनी वायभसे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.यावेळी मुंडे यांच्या अश्रूंना ही बांध फुटला होता. 

 

Advertisement

Advertisement