Advertisement

 लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता

प्रजापत्र | Saturday, 15/06/2024
बातमी शेअर करा

सोलापूर -  लोकसभा निवडणुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता, असा गंभीर आरोपी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.  सोलापुरात दोन दिवस आधी दंगली लावणार होते. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे. रक्ताने राजकारण करतात ही लोकं, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन : प्रणिती शिंदे
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात सोलापुरात बोलताना खासदार शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे. कृतज्ञता मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केलं आहे. काही दिवसापूर्वी एबीपी माझाशी बोलताना देखील हेच आरोप प्रणिती शिंदे यांनी केले होते. आता जाहीर भाषणातून पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी भाजपवर आरोप केले आहेत.

 

 

 

खासदार प्रणिती शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप
गावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते. ते कानात सांगितलं गेलं होतं. मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं. सीपीनी सांगितलं होतं, जा बाहेर नाहीतर या उमेदवारावर एफआयआर करावा लागेल. त्यावेळेस भाजपवाल्यांना कळलं होतं, निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांची मतदानच्या पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, त्यातून तुम्हाला हेच दिसेल, असंही यावेळी प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement