Advertisement

शिक्षकाच्या गळ्याला चाकू लावून लाखोंची चोरी !

प्रजापत्र | Saturday, 15/06/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१५ (प्रतिनिधी)- एका शिक्षकाच्या घराचा दरवाजा वाजवत काका, दार उघडा असे म्हणत चोराने आवाज दिला आणि दार उघडताच चोरट्याने शिक्षकाच्या गळ्याला चाकू लावून लुटमार सुरू केली. चोरट्यांनी शिक्षकास मारहाण करत घरातील ४० हजार रूपयांची रोकड आणि सहा तोळे सोने लंपास केल्याची घटना काल रात्री शहरातील पांगरी रोड गिराम नगर भागात घडली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी भेट देवून पाहणी केली असुन श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण काण्यात आले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होवू लागली आहे. त्यातच लुटमार देखील होवू लागली असून यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

 

बीड शहरातील पांगरी रोड गिराम नगर भागातील शिक्षक रंणजित गिते यांच्या घरात प्रवेश करून मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी तासभर धुडदूस घातला. एका चोरट्याने गिते यांच्या गळ्याला चाकू लावला तर दोघांनी घरातील सामानाची नासधूस करत रोकड आणि सोन्याचे दागिने घेतले. यावेळी संबंधीत शिक्षक घरात एकटेच होते. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

Advertisement

Advertisement