Advertisement

ओमराजे थेट अंतरवाली सराटीत

प्रजापत्र | Wednesday, 12/06/2024
बातमी शेअर करा

 मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 5 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे अनेक खासदार आमदार त्यांच्या भेटीसाठी जात आहेत. मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्याचं आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, आता धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. 

 

 

मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर ओमराजे निंबाळकर काय म्हणाले? 
ओमराजे निंबाळकर म्हणाले, मनोज जरांगेंनी त्यांच्या पद्धतीने त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. उपोषण जरी असलं तरी त्यांनी पाणी घेणे गरजेचे आहे. उपोषण असलं तरी त्यांनी पाणी पिलं पाहिजे, मी त्यांना विनंती केली आहे. सरकारने जे आश्वासन दिलेलं आश्वासन म्हणजे एका पद्धतीने फसवणूक केल्याचा प्रकार अशी समाजाची मानसिकता तयार झालेली आहे. सरकारने या उपोषणाची दखल घेऊन तातडीने पावलं उचलली पाहिजेत. आपण प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे नेणे योग्य वाटत नाही. हे समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि या माणसाचा अखंडपणे समाजासाठी लढा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे आपण राजकारण म्हणून बघितलं नाही पाहिजे, असं आवाहनही ओमराजे निंबाळकर यांनी केलं. 

 

 

तामिळनाडू भारताचे राज्य व तिथे आरक्षण टिकतं आपल्याकडे का टिकू शकत नाही?
पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, तामिळनाडू सरकारने 50% ची आरक्षण मर्यादा वाढली असताना टिकत ,आपलं आरक्षण टिकू शकत नाही? केंद्र सरकारला याबाबत आम्ही वारंवार विनंती करत आहोत. हे सगळं समजून सुद्धा जो केला जातो तो चीड आणणार आहे. यामुळे समाजाचा रोष निर्माण होतो. याबाबत सरकारने मार्ग काढावा, यासाठी पूर्ण ताकतीने आम्ही मागे लागू. तामिळनाडू भारताचे राज्य व तिथे आरक्षण टिकतं आपल्याकडे का टिकू शकत नाही? असा सवालही ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. 

 

 

परभणीचे खासदार संजय जाधव यांचाही मनोज जरांगेंना पाठिंबा 
ओमराजे निंबाळकर यांच्याशिवाय ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनीही यापूर्वी मनोज जरांगेंची भेट घेतली होती. त्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे एक लेटर त्यांनी ट्वीट केले आहे. 

Advertisement

Advertisement