Advertisement

वैद्यनाथाच्या अभिषेकावर बंदी

प्रजापत्र | Tuesday, 11/06/2024
बातमी शेअर करा

 परळी- बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात पिढ्यानपिढ्या पौरोहित्य करून उपजीविका भागवणाऱ्या सुमारे २०० कुटुंबावर विश्वस्त मंडळाच्या मनमानी कारभाराने गदा आली आहे. देवस्थान कमिटीच्या या निर्णयानंतर प्रचंड गदारोळ उठला आहे. भाविकांतून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ब्राह्मण, जंगम, गुरव, पुरोहीत आक्रमक झाले असून याबाबत मुकमोर्चा काढून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

 

परळीचे वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे विश्वस्त मंडळ आपल्या मनमानी कारभारासाठी प्रसिद्ध आहे. केवळ काही विश्वस्त स्वतःच्या हट्टापायी अनेक चुकीचे निर्णय लादत असतात. प्रभु वैद्यनाथाला दिवसभरात भाविकांकडून होणाऱ्या अभिषेकालाही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अभिषेक पावत्या देणग्यांच्या माध्यमातून येणाऱ्या मंदिरच्या उत्पन्नालाही खीळ घालण्याचा हा प्रकार आहे.

प्रभू वैद्यनाथाच्या अभिषेकांनाच मर्यादित करुन एकप्रकारे बंदी घालण्याचा तुघलकी निर्णय कमिटीने घेतला आहे. अभिषेकाच्या मर्यादितच पावत्या देणे, अभिषेकाला अपुरी वेळ, पुरोहितांना व अभिषेक करणाऱ्या भाविकांना कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसणे, येता-जाता पुरोहितांची मानहानी करणे आदी असंख्य प्रकार विश्वस्त मंडळाकडून केले जातात.

Advertisement

Advertisement