Advertisement

धोक्याची घंटा! वंजारवाडी गावात पन्नास गावरान कोंबड्याचा मृत्यू

प्रजापत्र | Monday, 11/01/2021
बातमी शेअर करा

तोंडार: संदीप बी.पाटील. कालच राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात बर्ड फ्लयु या रोगाचा फैलाव होत असल्याचे भाकित दिले होते , त्यातच परभणी जिल्ह्यात आठशे कोबंड्या दगावल्याची बातमी येते न येतेच आज उदगीर तालुक्यातील तोंडार ग्राम पंचायत अंतर्गत येणार्या वंजारवाडी येथील अशोक गोविंदराव मुंडे यांचा तब्बल पंचावन कोबंडया चा म्रत्यु झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. वंजारवाडी येथील अशोक गोविंदराव मुंडे यांनी आपल्या घरी एकुण साठ गावरान कोंबड्या ठेवल्या होत्या, त्या साठ कोंबड्या पैकी रात्री अचानक पणे पंचावन्न कोबंडया या म्रत अवस्थेत दिसलयाने त्यानी तोंडार आधार भुत ग्राम उपकेंद्र चे आरोग्य सेवक डब्लु पठाण यांना कलवले असता त्यानी तात्काळ डॉक्टर मुळे यांना कलवुन संबंधित पशुवैध्कीय विभागाचे डॉक्टर सह पं.स.चे आरोग्य विस्तार अधिकारी सतिश केंद्रे यानी सदर घटना स्थलावर ठान मांडून पुढील म्रत कोबंडया ची पुढील कार्यवाही करण्यासाठी आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकारी डॉक्टर आल्याची माहिती अशोक मुंडे यांनी दिली आहे, सदर घटनेमुळे परिसरातील कुकुट पालकात भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे..

Advertisement

Advertisement