Advertisement

शिरूरच्या सभेतील वक्तव्य भोवलं

प्रजापत्र | Monday, 10/06/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १० (प्रतिनिधी) – गैरकायद्याची मंडळी जमवून जातीय शत्रुत्व वाढवण्याची कृती करून एकात्मतेला बाधक वक्तव्य केल्याप्रकरणी माजी जि.प. सदस्य दशरथ वनवे, रामराव खेडकर, रामदास बड़े व इतर प्रमुख १५ ते २० जणांविरूध्द बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम १५३ (अ), १५३ (बी), २९५ (अ), ५०५ (२), १४३, १४९ भांदवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
 

 

बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हनुमान बापुराव मुळीक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.८ जुन २०२४ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जिजामाता चौक शिरूर कासार येथे दशरथ वनवे, रामराव खेडकर, रामदास बड़े व इतर प्रमुख १५ ते २० जणांनी गैरकायद्याची मंडळी
जमवुन जातीय शत्रुत्व वाढवण्याची कृती करून एकात्मतेला बाधक बक्तव्य करून मराठा समाजाच्या श्रध्देचा, भावनांचा अपमान करून दोन जातींमध्ये द्वेष भाव निर्माण करणारी विधाने केली. या प्रकरणी दशरथ वनवे, रामराव खेडकर, रामदास बड़े व इतर प्रमुख १५ ते २० जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि मोरे करीत आहेत. दरम्यान शिरूर कासार बंद झालेल्या सभेत वनवे व इतरांनी आपल्या भाषणात मराठा समाजाविषयी अवमानजनक वक्तव्य केले होते. त्यांच्याविरूध्द तात्काळ कारवाई करावी अशी मागणी दोन दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Advertisement

Advertisement