बीड-पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे (वय -३३) याने रविवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती.मात्र रविवारी त्याने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर आता सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांनी एक पोस्ट टाकत यात माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा असे भावनिक आवाहन केले आहे.
पंकजा मुंडे यांनी रविवारी सोशल मीडियावर पोस्टद्वारे स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही.मी लढत आहे संयम ठेवत आहे,तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा.कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का,किती कठीण आहे माझ्यासाठी?मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे.मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा.अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.शांत व सकारात्मक रहा प्लिज प्लिज.माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा.आई-बापाला दुःख देऊ नका त्यांच्या जीवाला घोर लावू नका.तुम्हाला शप्पथ आहे.मुंडे साहेबांची.१५ जूनपासून मी आभार दौरा करत आहे.तो पर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा असे आवाहन केले आहे.
बातमी शेअर करा