Advertisement

नीट परीक्षेसंदर्भात एनटीए प्रमुखांचा मोठा खुलासा

प्रजापत्र | Saturday, 08/06/2024
बातमी शेअर करा

  गेल्या महिन्यात घेण्यात आलेली नीट परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी विराेधी पक्षाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. निकालामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तथापि, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे म्हटले आहे.

 

देशातील ५७१ शहरांमधील ४,७५०  केंद्रांवर ५ मे रोजी राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा घेण्यात आली. यानंतर गुण वाढल्यामुळे विक्रमी ६७ उमेदवारांना पैकीच्‍या पैकी गुण मिळाले आहेत. एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार यांनी शनिवारी कोणताही पेपर फुटला नसल्याचे स्पष्टीकरण  दिले.

पत्रकार परिषदेत एनटीए प्रमुखांनी सांगितले की, एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गोष्टींचे विश्लेषण केले.  ही समस्या फक्त सहा परीक्षा केंद्रांपुरती मर्यादित आहे”, उमेदवारांच्या निकालात ग्रेस गुण मिळू शकतात आणि शिक्षण मंत्रालयाने १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल पुन्हा तपासण्यासाठी एक पॅनेल स्थापन केले आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही , असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement