Advertisement

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत?

प्रजापत्र | Saturday, 08/06/2024
बातमी शेअर करा

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मंत्रीमंडळातून मुक्त करावं, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडं केली होती. तसंच सध्या आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. पण आज भाजपच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आपण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचंच सूचक पद्धतीनं सांगितलं आहे. यामागचं कारणंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.  

फडणवीस म्हणाले, कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर हे सत्य नाही. मी आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की माझ्याही डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती आजही आहे. त्यामुळं मी अमित शाहांना भेटून आलो त्यांनीही मला सांगितलं की, पहिलं हे काम आहे तसं चालू द्या. त्यानंतर महाराष्ट्रात काय ब्ल्यू प्रिंट करायची ती करुयात. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत एक मिनिटं देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाही. एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो आता तर मी काम करतोच आहे आणि करणारच आहे.

 

दरम्यान, आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवराय असल्याचं सांगत पुरंदरच्या तहाचा दाखला देताना. शिवाजी महाराजांप्रमाणं हारलेले किल्ले आपण पुन्हा मिळवू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना मिळालेल्या यशाचंही विश्लेषण केलं. यातूनच उद्धव ठाकरेंना मराठी माणसानं मतं दिली नाहीत असा दावा करत त्याची गणितंही मांडली.

Advertisement

Advertisement