Advertisement

खत घेऊन जाणारा ट्रक पलटी !

प्रजापत्र | Saturday, 08/06/2024
बातमी शेअर करा

किल्लेधारुर–धारुर शहरानजीक असलेल्या घाटात आज (दि.८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास खत घेवून जाणारा ट्रक पलटी होवून एक जण ठार झाल्याची दुर्घटना घडली. 

 

 

 

अधिक माहिती अशी की, धारुर शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर घाटातील एका अवघड वळणावर  सकाळी अपघात घडला. धाराशिवहून माजलगावकडे खताचे पोते घेवून जाणारा ट्रक ( क्र. एम एच २५ यु ०२५१ ) एका वळणावर ब्रेक निकामी होवून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. यात ड्रायव्हर व कीन्नर गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमीना नागरीकांनी तात्काळ धारुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना चालक राहुल चंदनशिवे ( वय ३६ वर्ष) ठार झाल्याची तर कीन्नर विष्णु सुरवसे (वय २५ वर्ष) पाय फॅक्चर असल्याची माहिती मिळाली.

Advertisement

Advertisement