नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक निकालानंतर आता केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी 9 जूनला संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत हा शपथविधी होणार आहे. यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणकोण असणार याची चर्चा आहे. एनडीएतील घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असं सूत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत. आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे यांचा समावेश करावा अशी मागणी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
बातमी शेअर करा