गेल्या काही दिवसांपासून गोव्यात रखडलेला मान्सून अखेर गुरुवारी दुपारी महाराष्ट्रात दाखल झाला. दरम्यान आज (दि.७ जून) मान्सून तळकोकण ओलांडून पुढे सरकला आहे. दरम्यान पुढील ५ दिवस संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राची किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.पुढील 2 दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात काही ठिकाणी गडगडाटी वादळे आणि पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज
पुढील ५ दिवसांत पूर्व भारत, उत्तर प्रदेश आणि ईशान्य मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
‘या’ दिवशी मान्सून मुंबईमध्ये
नैऋत्य मान्सूनचे गुरूवार ६ जून रोजी दक्षिण कोकणात आगमन झाले. आज सकाळपर्यंत तो रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत सरकला आहे. मान्सूनची आगेकूच सुरूच असून, शनिवार (९ जून) ते रविवारपर्यंत (दि.१० जून) तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.