Advertisement

 नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार

प्रजापत्र | Friday, 07/06/2024
बातमी शेअर करा

 नवी दिल्ली - नरेंद्र मोदी  तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी  विराजमान होणार आहेत. रविवार, ९ जून २०२४ रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची तारीखही ठरली असून ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे, असंही जोशी यांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यासाठी जमलेल्या एनडीए नेत्यांना सांगितलं आहे. 

 

 

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी  संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली. एनडीएच्या खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्याची अपेक्षा आहे, मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे. 

 

 

लोकसभेत भाजपला धक्का, मात्र एनडीएनं गाठला बहुमताचा टप्पा 
२०२४ च्या लोकसभा निकालांनुसार, एनडीए आघाडी २९४ जागांवर विजय मिळाला असून, त्यापैकी एकट्या भाजप २४० जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडीला २३२ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये एकट्या काँग्रेसनं ९९ जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. २०१९ च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. या राज्यांमध्ये इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले पक्ष आघाडीवर आहेत.

Advertisement

Advertisement