महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शिफारस करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे. 27 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू करण्याची मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली
चारा छावणी व पाणी टंचाईवर देखील बैठकीत निर्णय झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ यांनी आग्रही सूचना केल्या. प्रशान वेगाने याकडे लक्ष देणार आहे. असे मुंनगंटीवार यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थिती लावली, अशी माहिती देखील मुंनगंटीवार यांनी दिलीजूनपासून अधिवेशन सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.