Advertisement

 बीड जिल्ह्यातील दुष्काळाची नाना पटोलेंनी केली पाहणी

प्रजापत्र | Friday, 31/05/2024
बातमी शेअर करा

बीड दि.३१ (प्रतिनिधी)- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली. गेवराई तालुक्यातील रूई, पांढरवाडी, राजपिंपरी याठिकाणी त्यांनी भेट देवून पाण्याअभावी करपलेली तुतीची शेती, मोसंबी आणि डाळिबांच्या बागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तुतीच्या
शेतातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मोबाईलवरून फोन केला. मात्र मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्रीही नॉट रिचेबल होते. या प्रकारामुळे पटोले यांनी मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांनाही शेतकऱ्यांच्या दुःखाचे गांभिर्य नसल्याचा आरोप केला.

 

गेवराई तालुक्यातील रुई येथे भेट देवून नाना पटोले यांनी तुतीच्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेच देशमुख, माजी मंत्री अशोक पाटील, पुजा मोरे आदिंची उपस्थिती होती, पटोले यांनी शेतकऱ्याशी संवाद साधला. सध्याचे सरकार झोपी गेलेले आहे. ते केंव्हा जागे होईल ? ही चिंता माझ्या मनात आहे. तुतीची शेती, मोसंबीच्या बागाची पाहणी केली. त्या पुर्णपणे जळून गेल्या आहेत. सरकारचे शेतक-यांकडे दुर्लक्ष आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असुन सरकारला कसलेच गांभीर्य नसल्याचा आरोप पटोले यांनी केला.

Advertisement

Advertisement