Advertisement

मनोज जरांगेंना मोठा दिलासा

प्रजापत्र | Friday, 31/05/2024
बातमी शेअर करा

पुणे : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये हजर झाले. पुणे जिल्ह्यातील सत्र न्यायालयात जरांगे पाटील यांनी हजेरी लावली. मनोज जरांगे पाटील हे २०१३ साली कोथरुड पोलीस ठाण्यातील एका फसवणुकीच्या प्रकरणासाठी हजर झाले. या प्रकरणात मनोज जरांगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने अटक वॉरंट रद्द केले आहे.

 

 

मनोज जरांगे पाटील कोर्टात हजर

मनोज जरांगे पाटील यांच्यावर २०१३ साली कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वॉरंट बजावण्यात आलं होतं. त्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले. यावेळी जरांगे पाटील यांनी न्यायालयासमोर सर्व समान आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी न्यायालयात हजर झालोय. याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

 

काय आहे नेमकं प्रकरण?
मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचं आयोजन केलं होतं .या नाटकाच्या प्रयोगानंतर पैसे देण्यात आले नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली होती. या तक्रारीनुसार कलम १५६(३) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

याच प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळालेला होता. याच प्रकरणी न्यायालयाने वॉरंट बजावले होते. यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुणे सत्र न्यायालयात हजर झाले.

मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा
दरम्यान, या प्रकरणात मनोज जरांगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने अटक वॉरंट रद्द केले आहे.

Advertisement

Advertisement