बीड - माजलगाव येथे घडलेल्या धाडसी चोरीचा तपास लावण्यात बीड पोलीस दलाचे श्वान 'टोरसला' यश आले. टोरसलाने इशारा केलेल्या आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून ३ लाख ८० हजारांचे दागिने जप्त केले. या कारवाई बद्दल श्वान टोरसलाचे कौतुक करण्यात येत आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९३/ २०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भादवी, कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माजलगाव पोलीसांनी श्वान पथक पाचारण केले. यासाठी पोलीस दलातील श्वान 'टोरसला' यास घटनास्थळी फिर्यादीच्या कपाटातील दागिने ठेवण्याचे पॉकेट वास श्वान 'टोरसला' दिला. यानंतर तो घराबाहेर पडला उजवीकडे वळून घरासमोरील रस्त्याने पश्चिम दिशेस असलेल्या माने यांच्या वाड्याच्या बाजुस असलेली जय महेश कांदा मिरची चटणी व पीठाचे गिरणीच्या दारासमोर फिरत वास घेवुन इशारा केला. त्यावरून पोलिसांनी उपस्थित संशयीत हर्षद ज्ञानेश्वर माने याला ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हाची कबुली दिली. नमुद आरोपी कडून गुन्ह्यातील चोरलेले साडे सहा तोळ्याचे दागिने किंमत ३ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले. या कारवाई बदल टोरसला आणि त्याच्या प्रशिक्षकाचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.