Advertisement

अखेर 'परिवर्तन'च्या संचालकाला अटक

प्रजापत्र | Thursday, 30/05/2024
बातमी शेअर करा

बीड-माजलगावमधील परिवर्तन मल्टीस्टेटने ठेवीदारांना  २० कोटींना चुना लावल्यानंतर याप्रकरणात माजलगाव शहर, ग्रामीण पोलीस ठाणे व शिवाजी नगर बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. यातील मुख्य आरोपी भारत अलझेंडेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा जामीन झाला मात्र 'परिवर्तन'चे इतर आरोपी फरार होते. अखेर काल रात्री १० वाजता या मल्टीस्टेटच्या संचालकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सदर आरोपी ७ वर्षांपासून पोलिसांना गुंगार देत होता.

 

 

बाबासाहेब नारायण ढगे असे त्या आरोपीचे नाव आहे. परिवर्तन मल्टीस्टेटने ठेवीदारांना ज्यादा पैशांचे आमिष दाखवून २० कोटींना फसवणूक केली होती.याप्रकरणात माजलगाव शहर, ग्रामीण पोलीस ठाणे आणि नंतर बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.२०१७ साली परिवर्तनने ठेवीदारांना चुना लावला होता. यातील मुख्य आरोपी भारत अलझेंडे व त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली होती.त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र या मल्टीस्टेटमधील संचालक व इतर आरोपी अद्याप फरार होते. अखेर काल रात्री १० वाजता संचालक असलेल्या बाबासाहेब ढगेला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याचे कळते.सदर कारवाई  पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 

पोलीस हवालदार मारुती कांबळे,पोलीस हवालदार राजू पठाण,पोलीस हवालदार अर्जुन यादव, पोलीस अमलदार बिबीशन चव्हाण यांनी केली आहे.

 

 

आर्थिक गुन्हे शाखा करतेय का?

हरिभाऊ खाडेला लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. या शाखेने मल्टीस्टेटमधील आरोपीना अटक करण्याऐवजी त्यांना दिलासा देण्याचे काम केले. ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला असताना खाडे व आर्थिक गुन्हे शाखेतील काही कर्मचारी स्वतःचे खिसे गरम करण्यात व्यस्त होते.२०१७ मधील परिवर्तन प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक करण्यात या शाखेला जमले नाही. आरोपी बीडमध्ये मोकळ्या वातावरणात फिरत असताना त्याला एलसीबीने अटक केली पण आर्थिक गुन्हे शाखेला हे जमले नाही. त्यामुळे या शाखेतील कर्मचारी नेमके करतात काय? असा सवाल ही उपस्थितीत होतं आहे.

 

 

 

 

Advertisement

Advertisement