महाराष्ट्र- गेल्या काही दिवसापासून राज्यात तापमान वाढले आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. दरम्यान, आता शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यामुळे आता या वर्षी तरी मान्सून वेळेवर सुरू होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली आहे. नैऋत्य मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात मान्सून १० जून पर्यंत पोहोचू शकतो असं हवामान विभागाने सांगितलं आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून तो १० ते ११ जून रोजी मुंबईत पोहोचण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. ११ जून रोजी मान्सून मुंबईत पोहोचतो. मात्र गेल्या वर्षी चक्रीवादळामुळे २ आठवडे मान्सूनला उशीर झाला होता.
हवामान विभागाने १३-१४ जून रोजी मान्सून बेंगळुरूमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून १ किंवा २ जून रोजी केरळमध्ये पोहोचेल. यानंतर ते ६ ते ७ जूनला कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. रामल चक्रीवादळामुळे कोलकाता येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. मात्र, १० जून ते २९ जून दरम्यान मान्सून बंगालमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. लखनौ हवामान केंद्राने उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये १९ जून ते २१ जून दरम्यान मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तवली आहे.
काही दिवसापूर्वी हवामान विभागाने मान्सूनबाबत एक अहवाल दिला होता.या अहवालानुसार, देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. मान्सून वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो. तसेच ला नीना सोबतच, हिंद महासागर द्विध्रुव (IOD)परिस्थिती देखील यावर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, हे मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत, असंही हवामान विभागाने म्हटले आहे.
मॉन्सून जोरदार बरसणार
यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मॉन्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साधारणतः जून ते सप्टेंबर यादरम्यान चांगला पाऊस होईल असा अंदाज 'साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरम'तर्फे (सॅस्कॉफ) वर्तविण्यात आला आहे.