Advertisement

अंतरिम जामीन मुदत वाढीसाठी केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव

प्रजापत्र | Monday, 27/05/2024
बातमी शेअर करा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अंतरिम जामिनाला ७ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणी संदर्भातील याचिका केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आरोग्याच्या काही तपासण्या करण्यासाठी केजरीवलांनी जामीन वाढवून मागितल्याचे   म्हटले आहे.

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर १० मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. केजरीवाल यांचा अंतरिम जामीन संपुष्टात येण्याच्या एका दिवसानंतर म्हणजे २ जून रोजी तुरुंग प्रशासनासमोर हजर रहावे लागणार आहे. परंतु केजरीवाल यांना पीईटी-सीटी स्कॅन आणि इतर वैद्यकीय चाचण्या कराव्या लागणार आहेत. यासाठी त्यांनी  तपासण्यांसाठी ७ दिवस मागितले आहेत, अशी माहिती आप आदमी पार्टीने दिली आहे.

 

 

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी २१ मार्च, २०२४ रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आम आदमी पार्टीचे सुप्रिमो आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांना लोकसभा निवडणूकांसाठी १० मे रोजी त्यांची अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

Advertisement

Advertisement