Advertisement

लाचखोर खाडेला २९ पर्यंत पोलीस कोठडी

प्रजापत्र | Friday, 24/05/2024
बातमी शेअर करा

बीड : जिजाऊ मल्टिस्टेटच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी एक कोटीची लाच मागणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडेला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीडच्या जिल्हा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पाच, एस एस डोके यांनी हे आदेश दिले. 

 

बीडच्या जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात कारवाई न करण्यासाठी एक कोटीची लाच मागितल्या प्रकरणात एसीबीने आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे विरुध्द गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला निलंबित करण्यात आले होते  गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल आठ दिवस फरार असलेला हरीभाऊ खाडे गुरुवारी सकाळी एसीबीला शरण आला होता.
त्याला शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पाचवे एस एस डोके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांनी खाडेला सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली. खाडेच्या घरुन रोकड, दागिने आणि खरेदीखत असे २ कोटी १८ लाखाचे घबाड मिळाले असून त्याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे एसीबीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. यावर न्यायालयाने हरीभाऊ खाडेला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

Advertisement