Advertisement

 वकीलाचे घर फोडणारे दोन चोरटे जेरबंद

प्रजापत्र | Friday, 24/05/2024
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२४ (प्रतिनिधी): बाहेरगावी गेलेल्या वकिलाच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याच्या दागीनेसह रोख रक्कम पळविन्याची घटना बुधवार दि. २३ रोजी घडली होती. या घटनेतील एका संशियतासह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.

 

 

 

दरम्यान घटना घडल्याच्या अवघ्या ६ तासात पोलिसांनी हा तापास पूर्ण केल्याने पोलिसांच्या कर्तबगारीचे कौतुक होत आहे.
शहरातील शिवाजी चौक, शाहूनगर येथे राहत असलेले अॅड. आजित रामभाऊ जगताप यांच्या घरी बुधवारी चोरी झाल्याची घटना निदर्शनास
आली होती. यावेळी चोरट्यांनी कपाटातील ठेवलेले सोन्याची तीन तोळ्याची चैन, तीन तोळ्याचे ब्रास्लेट, पत्नीच्या कानातील रिंग, झुंबर, नाकातील नथनी, मुलीच्या कानातील रिंग, मुलीचे हातातील सोन्याचे एक तोळ्याचे कडे असे आठ तोळ्याचे दागीने नगदी सात हजार पाचशे रूपये अज्ञात चोरट्यांनी पळविले होते. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करुन श्वान पथकास पाचरण केले. गोपनीय पद्धतीने तपास केला. व गुन्हा दाखल झाल्याच्या अवघ्या ६ तासात चोरीच्या या घटनेतील एका संशयीतासह अल्पवयीन असणाऱ्या का आरोपीला ताब्यात घेतले. या चोरी प्रकरणात आणखी इतर कोणी सहभागी आहेत का? याचा शोध पोलिसांकडून घेतल्या जात आहे. दरम्यान पोलिसांच्या या कर्तबगारीचे शहरात कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement