Advertisement

डोंबिवली एमआयडीसी आगीत २ महिलांचा मृत्यु

प्रजापत्र | Thursday, 23/05/2024
बातमी शेअर करा

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात एका कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीत आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडा हा ३४ वर पोहोचला आहे. त्यांच्यावर नजीकच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

डोंबिवलीतील एमआयडीसी २ फेजमधील कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीला आगीनं वेढलं. संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. काही क्षणांतच आगीनं रौद्ररूप धारण केलं. आसपासच्या तीन ते चार कंपन्याही आपल्या कवेत घेतल्या. तर मागील बाजूस असलेल्या कारच्या शोरूममध्येही ही आग पसरली. यात मोठं नुकसान झालं आहे. मोठी वित्तहानी झाली आहे. तर जीवितहानीही झाली आहे. आतापर्यंत दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

 

आगीच्या घटनेनंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर सर्व यंत्रणांनी बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
दोन महिलांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ३४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अजूनही कंपनीत दोन ते तीन जण अडकल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

Advertisement