Advertisement

जीव वाचवण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली!

प्रजापत्र | Thursday, 23/05/2024
बातमी शेअर करा

उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असताना आता अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफची बोट उलटली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथकाची बोट उलटली. या बोट दुर्घटनेत ५ जण बुडाले. तिघांचा मृत्यू झाला  तर दोघांचा शोध सुरु आहे.  

 

 

 

पथकातील चार जणांसह एक स्थानिक बोटीत बुडाला. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळची ही घटना आहे. यामध्ये  SDRF पथकातील तिघांचा मृत्यू झाला. काल प्रवरा नदीत दोन तरुण बुडाले होते. एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा होता शोध सुरू होता. दरम्यान शोध कार्यासाठी आज SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र बोट उलटल्याने SDRF पथकातील तिघांचा मृत्यू झाला. 

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले असून इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी ही माहिती दिली. 

Advertisement

Advertisement