Advertisement

आठवडा उलटूनही एलसीबीलाही सापडेना हरिभाऊ खाडे

प्रजापत्र | Wednesday, 22/05/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२२ (प्रतिनिधी)-किरकोळ चोरी, मटका आणि पत्ते खेळणारांना पकडून त्याचा गवगवा करणाऱ्या एलसीबीलाही आठवडा उलटूनही लाचखोर निलंबित पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे सापडत नसल्याचे चित्र आहे. 'खात्या'तल्याच फरार सहकार्याला शोधण्यात पोलीस अपयशी का ठरत आहेत याच्याच चर्चा सध्या जिल्ह्यात आहेत.जिजाऊ मल्टिस्टेटच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकरणात हरिभाऊ खाडे हा आरोपी आहे. 
   जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात थेट १ कोटींची लाच मागून राज्यात खळबळ उडवून देण्याच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेचा निलंबित पोलीस निरीक्षक   हरिभाऊ खाडे व त्याचा साथीदार आर.बी.जाधवर आरोपी असून दोघेही आठवडाभरापासून फरार आहेत. लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेला पकडण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीवर टाकण्यात आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याचे सांगितले जाते, मात्र अद्यापही एलसीबीला खाडेचा मागमूस लागलेला नाही. खाडेसारख्या लाचखोराला पोलीस दलातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा असताना आता खाडे पोलिसांना सापडत नसल्याने ही पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

 

Advertisement

Advertisement