Advertisement

मतदानादिवशी ढिसाळ कारभार सरकारकडून गंभीर दखल

प्रजापत्र | Tuesday, 21/05/2024
बातमी शेअर करा

मुंबई- राज्यातील पाचव्या टप्यात मतदानाची टक्केवारी घटली. त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना दिले आदेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रिये दरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे.

 

 

 

 

मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा मतदारांना झालेला त्रास त्यामुळे मतदानावर झालेला परिणाम यांची सविस्तर चौकशीचे करण्याचे एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव करीर यांना आदेश दिलेत. पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेसी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले याची तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश दिलेत.

सोमवारी राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यादिवशी राज्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झाले. मुंबईतील सहा मतदारसंघातील मतदान चर्चेचा विषय ठरलं. कारण, अनेक मतदान केंद्रामध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. तसेच संथ गतीने राग पुढे जात होती. याची दखल सरकारकडून घेण्यात आली आहे.

 

 

अनेक मतदारांना तासंतास रांगेमध्ये उभे राहावं लागलं. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय मतदान केंद्रामध्ये पुरेशा मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या नव्हत्या. अनेकठिकाणी वृद्धांसाठी विशेष व्यवस्था नव्हती. त्यामुळे मतदारांना त्रासाला सामोरे जावे लागले. याशिवाय मुंबईत उष्मा वाढला होता. प्रशासनाने यासाठी तयारी केली नव्हती का? असा सवाल केला जात आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील याप्रकरणी तक्रार केली होती. प्राथमिक सुविधा देखील मतदान केंद्रावर उपलब्ध नसल्याचं ते म्हणाले होते. मुंबईत एकंदरीत संथगतीने मतदान झाले. शिवाय राज्यातील मतदानाचा टक्का देखील घटला आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घटन्यामागे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे का? अशा प्रश्न विचारला जात होता.

Advertisement

Advertisement