Advertisement

राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के

प्रजापत्र | Tuesday, 21/05/2024
बातमी शेअर करा

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल  http://results.targetpublications.org ऑनलाईन पाहता येणार आहे. 

 

 

 

यंदा बारावीचा निकाल ९३.३७  टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. ९१.५१ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर ९१. ५१ टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी ९१.६०  टक्के आहे.

 

विभागनिहाय निकाल
कोकण : 91.51 टक्के
पुणे : 94.44 टक्के
कोल्हापूर : 94.24 टक्के
अमरावती : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
नाशिक : 94.71 टक्के
लातूर : 92.36 टक्के
नागपूर : 93.12 टक्के
मुंबई : 91.95 टक्के

Advertisement

Advertisement