Advertisement

आज किती आणि कुठले पॉझिटिव्ह ? कोणाला धक्का ?

प्रजापत्र | Wednesday, 17/06/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड शहरातील मसरत नगर भागातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना संसर्ग होण्याचे प्रकार सुरूच असून बुधवारी या रुग्णाच्या संपर्कातील आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. त्यासोबतच आणखी केज तालुक्यातील माळेगाव येथील मयत महिलेच्या संपर्कातील ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बुधवारी बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ५ झाली असून जिल्ह्यातील सक्रीय  रुग्णसंख्या २७  झाली आहे.
बीड शहराच्या मसरत नगर भागातील कोरोनाग्रस्त रुग्णाचा शहरात मोठ्याप्रमाणावर संपर्क आला होता , त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध अजूनही घेतला जात असून आरोग्य विभाग त्यांची तपासणी करत आहे. याच संपर्कातील काही लोकांचे नमुने बुधवारी पाठविण्यात आले होते त्यातील१ पॉझिटिव्ह आले आहेत. तर औरंगाबाद येथे मयत झालेल्या केज तालुक्यातील माळेगाव येथील त्या महिलेच्या संपर्कातील २८ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ४- पॉझिटिव्ह आणि २४  निगेटिव्ह आले आहेत.आता जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २७ झाली असून आतापर्यंत ६१ रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत. 

 

Advertisement

Advertisement