Advertisement

सावधान ! पुन्हा वाढतोय मृत्युचा टक्का

प्रजापत्र | Saturday, 09/01/2021
बातमी शेअर करा

आठ दिवसात 24 बळींची नोंद

बीड-बीड जिल्ह्यात कोरोनाच्या मृत्युदरात घट होत असल्याचे चित्र मागच्या पंधरवाड्यात निर्माण झाले होते. मात्र नव्या वर्षात जिल्ह्यात कोरोनाच्या मृत्युचा टक्का पुन्हा एकदा वाढू लागला आहे. मागील आठ दिवसात जिल्ह्यात तब्बल 24 कोरोनाबळी नोंदविले गेले आहेत. 
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी होताना दिसत असले तरी जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा मात्र पुन्हा एकदा वाढू लागला आहे. ऑक्टोबर,नोव्हेंबर महिन्यात बीड जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर चार टक्क्याला जाऊन पोहचेल असे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात हा मृत्युदर काहीसा कमी होऊ लागला होता. 2020 च्या अखेरच्या दिवशी हा मृत्युदर 3.13 टक्क्यावर स्थिरावला होता. मात्र चालू वर्षात पुन्हा एकदा कोरोनाबळी वाढू लागले असून 1 जानेवारीला 533 इतका असलेला जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 8 जानेवारीला 557वर पोहचला आहे. त्यासोबतच कोरोनाचा मृत्युदरही 3.27 इतका झाला आहे. वाढता मृत्युदर सर्वांसाठीच चिंतेचे कारण आहे.

 

Advertisement

Advertisement