Advertisement

मराठा आरक्षणासाठी तरूणाने गळफास घेऊन संपविले जीवन

प्रजापत्र | Sunday, 17/03/2024
बातमी शेअर करा

 आष्टी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून लढ्यात सहभागी असलेल्या तरूणाने आरक्षण मिळत नसल्याने रविवारी पहाटेच्या सुमारास आपल्या व्हाॅटसपवर स्टेटस ठेऊन चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली. प्रवीण दिलीप सोनवणे (वय- २९) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

 

 

अधिक माहिती अशी कि,आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरूण प्रवीण दिलीप सोनवणे हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे याच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उपस्थित होता. लढा उभारून देखील आरक्षण मिळत नसल्याने त्याने रविवारी मोबाईलवर स्टेटस ठेऊन पहाटेच्या दरम्यान स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना घडली आहे.त्याच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

 

एक मराठा लाख मराठा!
"गरजवंताचा लढा,निष्ठावंताचा लढा,शौर्यवंताचा बहुसंख्ख असुनही शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या मराठ्याचं आता एकच मिशन आधी मराठा आरक्षण मगच इलेक्शन या राज्याच्या गृहमंत्र्याला मराठा आरक्षणाचा चांगलाच आपल्या मतदान निवडणूक येण्यासाठी दहा टक्के आरक्षणाचे गाजर देऊन परत परत इलेक्शन झाल की तेच घडणार इथुन मागे बद्रीद सरकारने केले आहे.आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसी मधून आरक्षण देणे गरजेचे आहे.पण या गृहमंत्र्याला मराठ्याचा एवढा द्वेष आहे. तो मराठ्याना आरक्षण देऊ देणार नाही. आज पर्यंत खूप जणांनी आपले बलिदान दिले आहे. यांना काहीच फरक पडत नाही. आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही बेरोजगार तरूण असलेल्या मुलांनी आत्महत्या..." असे टेस्टस त्याने ठेवले होते.

Advertisement

Advertisement