Advertisement

नारायण शिंदे व कुटुंबियांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

प्रजापत्र | Monday, 22/06/2026
बातमी शेअर करा

 गेवराई दि.२२(प्रतिनिधी):  नागझरी येथील सरपंच नारायण शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या प्रकरणातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यासाठी राक्षसभूवन फाटा येथे रास्ता रोकोकरण्यात आला.
नागझरी येथील सरपंच नारायण शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या प्रकरणातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार (दि.२२) रोजी सकाळी दहा वाजता बीड-जालना मार्गावरील राक्षसभुवन फाटा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नागझरीसह खामगाव, आगरनांदर, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव, गंगावाडी आणि राक्षसभुवन परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, विविध सामाजिक संघटना, युवक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलकांनी दोषींना तात्काळ अटक करा, सरपंच कुटुंबाला संरक्षण द्या, गुंडगिरीचा बंदोबस्त करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आरोपींविरोधात कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तातडीने अटक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.  

Advertisement

Advertisement