Advertisement

आणखी एका जुगार अड्ड्यावर एसपींच्या पथकाचा छापा

प्रजापत्र | Sunday, 04/02/2024
बातमी शेअर करा

गेवराई-पोलीस अधिक्षक पथक प्रमुख असलेल्या सपोनि गणेश मुंडे यांनी गेवराईत सुरु असलेल्या आणखी एका जुगार अड्ड्यावर छापा मारून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यावेळी ६ जणांना पोलिसांनी जेरबंद केले. गेवराई शहरातील डिसेंट हॉटेलच्या पाठीमागे जुगार अड्डा मागील काही दिवसांपासून सुरु होता.याकडे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष नव्हते.त्यामुळे बीडमधून एसपींच्या पथकाने गेवराईतील या अड्ड्यावर छापा मारून ६ जणांवर गुन्हे दाखल केले.यावेळी २ मोटारसायकल,५ मोबाइलसह रोख रक्कम असा १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गेवराई शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Advertisement

Advertisement