Advertisement

सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

प्रजापत्र | Tuesday, 07/05/2024
बातमी शेअर करा

आज बारामतीमध्ये मतदान पार पडत आहे. मतदानाच्या दिवशीच सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी गेल्या आहेत. सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आईला म्हणजेच त्यांच्या काकीला भेटायला गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी दाखल झाल्या असल्याची माहिती मिळत आहे.आज बारामतीमध्ये मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.  

 

 

त्या म्हणाल्या की, अजित पवार यांनी खूप चांगलं उत्तर दिलं आहे. आई पाठीशी असणं खुप महत्वाचं असतं. आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काय असतं. यावेळी त्या काकींचा आशिर्वाद घेण्यासाठी अजित पवारांच्या घरी आल्या असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे. आज बारामतीत मतदानाची रणधुमाळी पाहायला मिळतेय. महायुतीकडून अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या आईची भेट घेतली आहे. बारामतीत नणंंद भावजयीमध्ये थेट लढत होत आहे.

Advertisement

Advertisement