Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

प्रजापत्र | Thursday, 19/10/2023
बातमी शेअर करा

केज - बोरी सावरगाव ते आंबेजोगाई दरम्यान अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

            केज तालुक्यातील दिपेवडगाव येथील रामप्रसाद भाऊसाहेब गुळभिले (वय-३७) आणि वासुदेव अनंत देशपांडे (वय-४३) हे दोघे बुधवारी (दि.१८) रात्री 11:30 च्या दरम्यान बोरी सावरगावहून आंबेजोगाईला निघालेले असताना त्यांची दुचाकी खटकळी पुला जवळ आली असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

            सदरील घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार श्री.बडे यांनी पुढील कार्यवाही करत त्यांना आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. आणि त्या ठिकाणी दोघांच्याही मृतदेहाचे शिवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सदरील अपघात नेमका कसा घडला याची चौकशी एपीआय योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफ वडगाव पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement