Advertisement

 अ‍ॅड. सदावर्ते दाम्पत्याचं एसटी बँक संचालकपद रद्द

प्रजापत्र | Wednesday, 08/05/2024
बातमी शेअर करा

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याने एक मोठा दणका दिला आहे. एस टी बँकेतलं संचालक पद सदावर्ते दाम्पत्याचं रद्द करण्यात आले आहे. सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ज्ञ संचालक म्हणून यापुढे कार्यरत राहू शकणार नाहीत, असा निर्णय दिला गेला आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी यासंदर्भात सहकार आयुक्ताकडे तक्रार दिली होती.  

 

 

ज्या वेळेपासून सदावर्ते दाम्पत्याकडे ही बँकेवर संचालकपदी आले. तेव्हापासून ते चर्चेत राहिले होते. ते संचालक असून अनेकदा कार्यकरीणीत गैरहजर राहिले, अशी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये या दाम्पत्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आता सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता हे संचालक पद रिक्त झाले आहे.

 

 

तक्रारदार संदीप शिंदे यांनी यासंदर्भात माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, "जेव्हापासून सदावर्ते यांची सत्ता एसटी सहकारी बँकेवर आली, तेव्हापासून त्यांनी ही बँक खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे, असे लोकांना वाटत आहे."

दे पुढे म्हणाले, "एसटी कामगार अत्यंत हवालदिल झालेला आहे. गेली आठ महिने आम्हाला कर्ज मिळत नाही. अशातच सदावर्ते यांच्याकडून वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर विषय आणले गेले. जे पोटनियम बदलायचे होते, त्याची माहिती त्यांनी सभासदांना दिली नाही. याची तक्रार मी कामगारांच्या वतीने सहकार आयुक्तांकेडे केली होती. याची दखल घेऊन आता आयुक्तांनी ही कारवाई केली आहे." 

Advertisement

Advertisement