Advertisement

आष्टीत महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला

प्रजापत्र | Friday, 23/07/2021
बातमी शेअर करा

 

प्रविण पोकळे

 आष्टी - शहरातील फत्तेशाह फुखारी दर्ग्याच्या बाजूला एका महिलेचा संशयितरित्या मृतदेह आढळून आला आहे. त्या महिलेची ओळख पटत नसल्याने सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन आष्टी पोलिसांनी केलेआहे.एका अनोळखी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
        

 

 आष्टीमध्ये फत्तेशाह बुखारी दर्ग्याच्या बाजूला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह स्थानिक नागरिकांना शुक्रवार दि.२३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता आढळून आला. सदर महिला हि अंदाजे ३० ते ३५ वयाची आहे. चेहरा गोल,रंग गोरा,बसके नाक,काळे केस, अंगात जांभळा रंगाची साडी,गळ्याला शस्त्रक्रिया केल्यासारख्या पांढरा रंगाचा चट्टा असे वर्णन आहे.
           आष्टी पोलिसांनी या महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेतला असता काहीही माहिती मिळू शकली नाही.याबाबत आष्टी पोलिसांनी सध्या आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर वर्णनाची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास अथवा फोटो मधील दिसत असलेल्या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास आष्टी पोलिसांशी 02441282533 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी केले आहे.

 

 

 

 

Advertisement

Advertisement