Advertisement

  शिरूरसाठी ३ कोटी तर आष्टी,पाटोद्यासाठी लवकरच निधी              

प्रजापत्र | Saturday, 10/07/2021
बातमी शेअर करा

 

 आष्टी-प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधकाम करण्यात येणाऱ्या घरकुल योजनेमध्ये आष्टी, पाटोदा आणि शिरूर या नगरपंचायती राज्यामध्ये अव्वल ठरल्या असून शिरूर नगरपंचायतला केंद्र सरकारच्या निधीतील २ कोटी ९८ लक्ष रुपये प्राप्त झाले आहेत.येत्या दोन आठवड्यात आष्टी, पाटोदा नगरपंचायतीचे निधी प्राप्त होणार असल्याची माहिती आ. सुरेश धस यांनी दिली. आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. सुरेश धस बोलत होते.

 

 

आष्टी,पाटोदा,शिरुर नगरपंचायत ला राज्यात सर्वाधिक घरकुल मंजूर असून शिरुर शहराचे २ कोटी ९८ लक्ष रुपये सोमवारी व मंगळवारी लाभार्थ्यांना मिळतील व आष्टी पाटोदा शहराचे २ आठवड्यात लाभार्थ्यांना मिळणार आहेत. आष्टी शहरासाठी आनंदाची बाब म्हणजे पाणी पुरवठा योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली आहे.ऊसतोड मजूरांना महामंडाळाने तरतुद केली आहे.त्याचा कामापेक्षा डिंडोरा पिटवला जात आहे.ऊसतोड मजूरांचा कायदा मंजुर होणे आमची मागणी आहे असे धस म्हणाले. राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नाला सामोरे जाता येत नाही म्हणून सरकारने अधिवेशन गुंडाळले असा आरोप देखील त्यांनी केला.
 

Advertisement

Advertisement