Advertisement

कळंब रोडवरील माळेगाव नजीक तरुणाचा मृतदेह आढळला

प्रजापत्र | Monday, 15/02/2021
बातमी शेअर करा

 केज दि.१५ - तालुक्यातील साळेगाव ते माळेगाव दरम्यान तुकाराम गुंठाळ यांच्या गव्हाच्या शेतात एका २८ वर्ष वयाच्या इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.       
            युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पालवे आणि  कोळी व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले आहेत. सदर मयत इसम हा कळंब येथील रंगकाम करणारा लखन महादेव सोनवणे असल्याचे बोलल्या जात आहे. सदरील तरुणाच्या डोक्याच्या मागील भागावर मार लागलेला असून कानातूनही रक्त आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Advertisement

Advertisement