Advertisement

अमरावती,वर्ध्यासह काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड

प्रजापत्र | Friday, 26/04/2024
बातमी शेअर करा

 

महाराष्ट्र राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी केली.

 

मतदानावेळी कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले.अमरावती, अकोला, नांदेड आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

 

 

नांदेडमध्ये सुमारे दीड तासांपासून मतदान यंत्र बंद असल्याची माहिती मिळत आहे. सावरगाव निपाणी या गावामधील हा प्रकार आहे. यामुळे सध्या मतदान प्रक्रिया थांबल्याचं समजत आहे. साम टीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.वर्ध्याच्या देवळी येथे EVM मशीन बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली आहे. मशीनच बंद पडल्यामुळे कोणीही मतदान करू शकलेलं नाही. अखेर, अधिकाऱ्यांनी मशीन पुन्हा सुरू केल्यानंतर मतदानास देखील सुरुवात झाली आहे.अमरावतीच्या वडरपुरा भागातील मतदान केंद्रावर देखील EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर येत आहे. सुमारे 15 मिनिटे ही मशीन बंद होती. यानंतर अधिकाऱ्यांनी मशीन सुरू केली.

महाराष्ट्रातील ८ लोकसभा जागांसाठी आज मतदान
बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे.

Advertisement

Advertisement