Advertisement

तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 07/02/2021
बातमी शेअर करा

आष्टी(प्रतिनिधी) रागाच्या भरात घरातील कडीला सोलीने गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपून टाकले.आष्टी तालुक्यातील वांळूज येथील घटना लक्ष्मण रामचंद्र खाडे (२८) असे मयत तरूणाचे नाव आहे.
           याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आष्टी शहरापासून १० कि.मी.अंतरावर असलेले वाळूंज येथील लक्ष्मण रामचंद्र खाडे या तरूणाने आपल्या राहत्या घरी शनिवार दि.६ राञी साडेनऊच्या दसम्यान घरातील सोलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.राञी दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या खोलीत बघीतले असता तो मृृृृत अवस्थेत आढळून आला दि.८ रविवारी सकाळी आष्टी येथील ग्रामिण रूग्णालय शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्यावर वांळूज येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.मयत लक्ष्मण यांच्या पश्चात दोन बहिणी,आई-वडिल व पत्नी असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement