Advertisement

कोळवाडीजवळ डिझेलच्या टँकरने घेतला पेट

प्रजापत्र | Friday, 12/12/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१२(प्रतिनिधी)-ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालीपासून जवळ असलेल्या कोळवाडी गावाजवळ डिझेलच्या टँकरने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी ५.१५ च्या सुमारास घडली आहे.भर रस्त्यावर वेगात असलेल्या टँकरने पेट घेतल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.ग्रामीण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल होत आहेत.
    शुक्रवारी सायंकाळी पेट्रोल पंपासाठी डिझेल घेऊन येणारे टँकर कोळवाडीजवळ आल्यानंतर पेटले.अज्ञात कारणातून या टँकरला आग लागली होती.भररस्त्यावर धावत्या टँक्टरने पेट घेतल्याने खळबळ उडाली.टँकर डिझेलचे असल्याने स्फोट होऊन गाडी जळून खाक झाली.या आगीत परिसरातील रस्त्यावर असलेल्या झाडांना सुद्धा याचा मोठा फटका बसला असून झाडे पेटली आहेत. सध्या घटनास्थळी ग्रामीण पोलीस आणि अग्निशामक दल पोहत असल्याचे कळते. या आगीत जीवितहानी झाली का याची माहिती अजून समोर आलेली नाही. 

Advertisement

Advertisement