बीड: संतोष देशमुख(Santosh Deshmukh murder )हत्या प्रकरणाला १ वर्ष संपल्यानंतर अखेर बीडच्या विशेष मकोका (MCOCA)न्यायालयात या प्रकरणातील दोषारोप निश्चित करण्यासाठी प्रदीर्घ युक्तिवाद करण्यात आले. बचाव पक्षाकडून केलेली मुदतवाढीची मागणी स्वीकारत विशेष न्या. पी व्ही पटवदकर यांनी आरोप निश्चितीसाठी १९ डिसेंबरची तारीख दिली आहे
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad)प्रमुख आरोपी असलेल्या या खटल्यात आरोप निश्चितीसाठी होत असलेल्या विलंबाबद्दल मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेतले जात होते. मागच्या तारखेसच न्यायालयाने १२ डिसेंबरला दोषारोप निश्चिती केली जाईल असे सांगितले होते. मात्र शुक्रवारी पुन्हा आरोपींच्या वकिलांनी अभियोग पक्षाकडून आलेला नवीन पुरावा आम्हाला मिळालेला नसल्याने १ तारीख वाढवून देण्याची विनंती केली होती.त्याला अभियोग पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि सहायक सरकारी वकील बी डी कोल्हे यांनी जोरदार विरोध केला. बचाव पक्ष जाणीवपूर्वक प्रकरण लांबवित असल्याचे अभियोग पक्षाकडून सांगण्यात आले. बचाव पक्षाकडून अभियोग पक्ष सातत्याने नवी नवी कागदे समोर आणतो, ते बचाव पक्षाला दिले जात नाहीत. सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने पुरावे म्हणून कागद जोडले जात आहेत. दोषारोपानंतर किती तरी महिन्यांनी नवीन पुरावा समोर आणला जातो, हे नियमोचित नसल्याची भूमिका घेतली. सुमारे तासभराच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने दोषारोप निश्चितीसाठी १९ तारीख दिली आहे

बातमी शेअर करा
