राज्यातील जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल संताप आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोक वाट बघत असून, त्यांचा कल मतदानातून दिसून येईल. राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून, लोकसभेला ३२ ते ३३ जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.
सांगलीबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी काय केले, हे बघितले पाहिजे. योग्य लढत व्हावी, हा माझा प्रयत्न आहे. भाजपाविरोधात ताकद एकत्र करण्याचे काम केले पाहिजे. राज्यस्तरीय बैठकांतून काय झाले, हे आता बाहेर सांगणे योग्य होणार नाही. जे लोक वावड्या उठवत आहेत, त्यांनी आत्मचिंतन करावे, एकास एक लढत व्हावी, अशी माझी भूमिका आहे. अर्ज माघारीपर्यंत काहीही होऊ शकते, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
बातमी शेअर करा