बीड-पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते.याची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली होती.गणेश मुंडेंनी पथकाच्या कार्यकाळात फरार ३५ आरोपी पकडले,५ जुगार अड्ड्यावर छापा मारून ३८ जणांना ताब्यात घेत ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.दारूच्या ४ कारवाया करत ८ आरोपी ताब्यात घेऊन ३ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला.याशिवाय ४ हजार ब्रास वाळू ताब्यात घेऊन २३ वाहने व मुद्देमाल असा ५ कोटींपेक्षा अधिकचा माल ताब्यात घेतला होता.गणेश मुंडेंनी आपल्या कारवायांमुळे माफ़ियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.मात्र नंतर पथक बरखास्त केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या मुंडे यांनी मागच्या आठ दिवसांत जुगार अड्ड्यावर परळीत ३,नेकनूरमध्ये २,माजलगावमध्ये ३,सिरसाळामध्ये १ कारवाया करत आपली मोहीम सुरूच ठेवली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गणेश मुंडे यांनी पथक प्रमुख म्हणून काम करताना अनेक चर्चेत राहणाऱ्या कारवाया केल्या.यात विशेष करून माफियांविरोधातील कारवाया महत्वाच्या ठरल्या होत्या.मात्र नंतर पोलीस अधीक्षक यांनी पथक बरखास्त करून गणेश मुंडेंना आपल्या मूळ जागी म्हणजेच स्थानिक गुन्हे शाखेचे दुय्यम अधिकारी म्हणून कर्तव्यास पाठविले.सध्या त्यांचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.मागच्या आठ दिवसांत मुंडे यांच्या पथकाने जुगाऱ्यांवर परळीत ३,नेकनूरमध्ये २,माजलगावमध्ये ३,सिरसाळामध्ये १ कारवाई करून अवैध धंद्यांविरोधात दंड थोपटल्याचे पाहायला मिळत आहे.
बातमी शेअर करा