किल्लेधारुर : शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक कोरोना पॉझिटीव्ह आले असून यानंतर महाविद्यालय प्रशासनाने कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याची अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.
येथील कनिष्ठ महाविद्यालयातील ३२ वर्षीय प्राध्यापक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दि.१ रोजी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. यानंतर आरोग्य विभागाकडून त्यांच्या संपर्कातील दोघांची कोविड-१९ चाचणी घेण्यात आली असून सदरील दोन्ही अहवाल निगेटिव्ह आली आहेत. प्राध्यापक बाधित आढळून आल्याने कर्मचारी व विद्यार्थ्यांना कोरोना नियम काटेकोर पाळण्याची सक्ती करण्यात आली. तात्काळ परिसर निर्जंतूकीकरण करुन संपर्कातील लोकांच्या तपासणी करण्यात आली. सध्या महाविद्यालयात सरासरी ४० टक्के उपस्थिती असून कोविड-१९ ची सर्व नियम सक्तीने पाळली जात असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.झेड. सिरसाट यांनी दिली.