Advertisement

लसीचे दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा - उद्धव ठाकरे

प्रजापत्र | Tuesday, 05/01/2021
बातमी शेअर करा

 

डी. डी. बनसोडे / केज

लसीचे कांही दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा - उद्धव ठाकरे

मुंबई दि.५ - लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेेेत.

         वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या तयारीचं सादरीकरण केलं.

ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसापासून असं निदर्शनास आलं आहे की, इतर राज्यातील विमानतळावर उतरून प्रवासी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणं शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या त्या विमानतळावरून क्वारंटाईन करावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेत जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळावरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

Advertisement

Advertisement