आष्टी- भर दिवसा बुधवारी (दि.६) बिबट्याने धानोराकरांना दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या.
अधिक माहिती अशी कि, आष्टी तालुक्यातील धानोरा येथील गायकवाड मळा या शेतात बुधवारी (दि.६) भर दुपारी बिबट्या आढळून आला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. दोन दिवसांपूर्वी नांदूर विठ्ठलाचे येथे एक बिबट्या आढळून आला होता. हा बिबट्या तोच असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जात आहे.
बातमी शेअर करा