मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत महत्वाची अपडेट. १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.आज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलनाची पुढील दिशा येत्या दोन दिवसात स्पष्ट करु.. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.