मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांनी सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं आहे. आम्हाला कायद्याचं पालन करायचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला आहे. शहाणी भूमिका घेऊन परत जातो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी भंबेरी गावातून आंतरवाली सराटीमध्ये परतले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने शांत रहावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेलं नाही. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिलं पाहिजे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी तसेच जरांगे पाटील यांनी मुंबईला जावू नये याकरीता आग्रही असल्याने अंतरवाली सराटी येथे मोठया प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता असून, त्यामुळे धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व तालुक्यातील इतर मार्गावर मोठया प्रमाणावर गर्दी जमून दळणवळण विस्कळीत होण्याची, सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होण्याची, गर्दीमुळे सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णय घेण्यात आला. तसेच, सदरील संचारबंदी आदेश दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आलं. ज्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला.